नाताळ सणाच्या निमित्ताने हाजी शाहनवाज खान व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटपनवी मुंबई : हाजी शाहनवाज खान व लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या वतीने जिवन जोति आनाथ नेरूळ सेक्टर -16 येथील 18 वर्षाखालील 100 मुला-मुलींना नाताळ सणानिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार खाऊ,व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले.

या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता. यावेळी एमआयएम चे महाराष्ट्र राज्यचे महासचिव हाजी शाहनवाज खान, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरुभाई म्हात्रे जिवन जोति आनाथ आश्रमा चे अध्यक्ष सचिन जाधव व इतर मान्यवर व संस्थेचे सभासद आदी उपस्थित होते.