संपादक/सत्यवान रामटेके
कोंढाळा(देसाईगंज):- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील सुशिक्षित,होतकरू,मन मिळावू व सर्वांना आपले समजून साजेसे करणारे व्यक्तिमत्त्व असणारा २८ वर्षीय तरुण अशोक मनोहर लेनगुरे याचा रात्री झोपेत असतांना सर्प दंश होऊन मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक-११ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली आहे.
कोंढाळा येथील २८ वर्षीय तरुण अशोक लेनगुरे काल दिनांक-१० नोव्हेंबर रोजी रात्रो अंदाजे ११ ते १२ वाजेच्या सुमारास कोंढाळा गावापासून १ किलोमीटर अंतरावरील लहरी कारखान्यात रात्र पाळीत काम करीत असतांना झोपेत गेला; मात्र अचानकपणे झोपेत असतांना हाताच्या बोटांना काहीतरी दंश केला असल्याची त्याला जाणीव झाली.दंश झाल्याची जाणीव होताच; अशोक ची भंबेरी उडाली.त्यामुळे सोबत असलेला व्यक्ती पटकन झोपेतून जागा झाला.त्यानुसार सोबतीला असलेल्या व्यक्तीने इकडे-तिकडे बघून रात्र किडा वा सरपटणाऱ्या प्राणी यांच्याकडे लक्ष केंद्रित केले.लक्ष केंद्रित केले असता
कारखान्याच्या खोलीतच सोबत्याला साप दिसला. त्यानंतर लगेच सोबत असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान साधून घडलेल्या घटनेची गावात माहिती दिली.माहिती कळताच लगेच कुटुंबीय व गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन अशोक ला रात्री २ वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय आरमोरी याठिकाणी भरती करण्यात आले.मात्र काही कारणास्तव अशोक ला जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय कार्यालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.गडचिरोली येथे उपचार सुरू असतांना काही कालांतराने अशोक ची प्रकृती बिघडू लागली.अशातच प्रकृती खालावल्याने अखेर आज पहाटेच्या सुमारास अशोक ची प्राणज्योत मावळली.
अशोक मोल मोजुरी करून कुटूंबीबियांस हातभार लावण्यासाठी मदत करीत होता व जमेल ते काम करायचा; गावात होतकरू,मन मिळावू व सर्वांना आपले समजून साजेसे करणारे व्यक्तिमत्त्व असणारा २८ वर्षीय तरुण अशोक लेनगुरे सर्प दंशाने मृत पावल्या प्रकरणी गावामध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.