पत्नीने विचारले, दारु का पित बसता? पतीने रागाच्या भरात…


वर्धा : व्यसनाधीन व्यक्ती भावना अनावर झाल्यावर काय करेल याचा नेम नसतो, असे म्हटले जाते. समुद्रपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रामनगर इथेही असे विपरीत घडले. येथे राहणाऱ्या संजय लक्ष्मण येलगुंडे याला दारूचे जबर व्यसन होते. घटनेच्या दिवशी तो पिलेला असल्याने पत्नीने त्यास हटकले. दारु का पित बसता, असे विचारले. त्यातून दोघात वाद विकोपाला गेला.रागाच्या भरात संजयने घराच्या अंगणातील लाकडी बल्लीला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती शंकर धोटे यांनी समुद्रपुर पोलीसांना दिली. प्रभारी ठाणेदार सुनील दहिभाते यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली.