नोकरीवाला नवरा हवाय ही अट ठरतेय तरुणांसाठी डोकेदुखी




गडचिरोली : एकेकाळी हुंडापध्दती ही मुलींच्या वडीलांसाठी गळ्याचा फास बनून होती. आत्ता ती पध्दत हळूहळू लुप्त होत असली तरी मुलीना नोकरीवाला नवरा हवाय ही अट सुशिक्षित तरूणासाठी डोकेदुखी ठरत असून मुलीच्या वडीलांनाही अपेक्षांचे ओझे सहन करता करता नाकीनऊ येत असल्याचे दिसुन येत आहे.

आता तुळशीविवाह झाल्यानंतर लग्नाचा बार उडणार आहे. दिवाळी झाल्यानंतर वर-वधु संशोधनाला जोर आला आहे. मात्र मुलापेक्षा मुलीच्या अपेक्षा मोठया प्रमाणात वाढलेल्या दिसुन येत आहेत





आजच्या धकाधकीच्या आणि अनिश्चिततेच्या काळात आपल्या मुलीचं भविष्य उज्वल व्हावं ही प्रत्येक मुलीच्या आई-वडीलांची अपेक्षा असते. त्यानुसार तिच्यासाठी वरमुलगा शोधताना मुलगा चांगला असावा ही अपेक्षा करणे चुकीचे नाही. पण मुलाची निवड करतांना समाजातील लोकांचा प्राध्यान्यक्रम चुकीचा झाला आहे. कोणत्याही मुलाची निवड करण्यासाठी फक्त मुलगा सरकारी नोकरी आहे की नाही पाहणे यासोबतचं तो कसा आहे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, मग लग्नानंतर मुलींना याचे वाईट परीणाम सहन करावे लागतात.

मुलगा कमावणारा असला पहिजे पात काही चुकीचं नाही. पण सगळ्यात आधी पैसा न बघता तो मुलगा कसा आहे. त्याचे वागणे, बोलणे, सामाजात वावरतांना इतरांशी त्याचा व्यवहार, मुलीला समजून घेणार की नाही या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणे तितकेच महत्वाचे आहे.

दिवसेंदिवस घटस्फोट होण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. त्यातही सुशिक्षित आणि नोकरीवाल्यांच्या घटस्फोटाची संख्या तुलनेने जास्तआहे.


आहे. त्याचे कारण, फक्त सरकारी नोकरी पाहून मुलाचं लग्न लावून दिल्या जाते. मुलीची पसंत-नापसंत, आवडी-निवडी या सर्व गोष्टींचा तितकासा विचार केला जात नसल्याने या सर्व कर्माचे फळं निष्पाप मुलींना नंतर सहन करावे लागतात.

मुलीच लग्नाचं वय असते. मुलगी थोडी जरी शिकलेली असली तरी सरकारी नोकरीवाला मुलगा पाहण्याचा हा अट्टहास अशी करता-करता करता एक दिवस असा येतो की मुलीचं वय वाढते आणि मग त्याहून वाईट

मुलाशी लग्न करावे लागते. समाजामध्ये निर्माण झालेले असे भयाण सत्य समाजाला नुकसान देऊनचं जातात. काही काही मुली प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यसनाधीन(दारू, गांजा, सट्टेबाज, जुगारी)तरुणांना नवरा करतात आणि मग मोठा मग नंतर पश्चाताप करतात हे सत्य आहे.

त्यामूळे कुठलाही निर्णय घेतांना सगळ्या गोष्टींचा सारासार विवेक बुध्दीने विचार केला तर आपल्या मुलाचं असो की मुलीचं भविष्य बर्बाद होण्यापासून वाचू शकते असे सुजाण नागरीकांचे मत आहे. सद्यास्थितीत बेरोजगारीचे प्रमाण वाढले असल्याने मुलींनीही अवास्तव अपेक्षा ठेऊ नयेत अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.