ईसमास अपघातात गंभीर जखमी करणाऱ्या दुचाकीस्वारास सश्रम कारावासप्रथमश्रेणी न्यायालयाचा आदेश

गडचिरोली - दुचाकी हयगयीने चालवून समोरील दुचाकीस धडक देऊन गंभीर जखमी केल्या प्रकरणी गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधीशांनी आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रविंद्र भगवान नागापूरे असे आरोपीचे नांव आहे. प्राप्त माहितीनुसार मुरखळा येथील एक इसम आपली पत्नी व मुलासह मोटार सायकल एमएच ३३ बी - ९६१२ ने मुरखडा येथून पुलखल येथे त्यांचे नातेवाईकांचे घरी घरगुती कामा निमीत्ताने मुलकडे जाणाऱ्या महामार्गाने जात असतांना आरोपीने मोटार सायकल क्रमांक एम.एच. ३३ के ९६१२ हयगयीने चालवून दुचाकीस मागेहुन धडक दिली. या अपघातात समोरील दुचाकीस्वार आपल्या मुलासहगाडीवरून खाली पडल्याने

त्यांच्या डाव्या हाताचे मनगटाला जबर मार लागला. डावा हात मनगटापासून फॅक्चर झाला. या संदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारीनुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय अहवालावरून प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणाची सुनावणी गडचिरोली येथील प्रथमश्रेणी न्यायाधिश रघुवंशी यांच्या न्यायालयात करण्यात आली. साक्षपुरावे तपासून न्यायधिशांनी आरोपीस सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दंड न भरल्यास आणखी कारावास भोगावा लागणार असल्याचे आदेशात नमुद केले  आहे..