स्वमालकीच्या शेतातील रेती चोरट्यांवर कारवाई करागडचिरोली ब्युरो. दोन ठेकेदारांनी माझ्या आंबेशिवणी येथील स्वमालकीच्या शेतामधून जवळपास 8 हजार 769 ब्रास रेती अवैधरित्या उत्खनन केले असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रदीप भैसारे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

तालुक्यातील आंबेशिवणी येथील सर्व्हे क्र. 398 व 494 / ब आमच्या स्वतःच्या मालकांचे जमीन आहे. त्याबाबतचा सातबारा, तलाठी नकाशा संलग्नीत असून हद्द कायम मोजणी 17 ऑक्टोबर व 3 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आदी चारही दिशेला लागून असलेल्या भूधारकाच्या समक्ष दुर्बिण दगड मोक्यावरील कायम लागू वहिवाटी, प्रचलित नकाशाचे

आधारे सर्वसमक्ष उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून खुणावर दगाडने सिमांकन केलेले असल्याची माहिती भैसारे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. शेतातून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भैसारे यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला देवेंद्र मेश्राम उपस्थित होते.