पुणे, 15 नोव्हेंबर : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार केला आहे. पुण्यातल्या वनवाडी भागात आई-वडिलांबरोबर राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाने वारंवार बलात्कार केला आणि ती मुलगी गर्भवती झाली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जेव्हा ती 16 वर्षीय मुलगी घरी एकटी असायची तेव्हा तिचा जन्मदाता नराधम बाप घरी यायचा, तिला मारायचा आणि कपडे काढायला सांगायचा. तो स्वतःच्या मुलीवर बलात्कार करत होता. ती रडली, विरोध केला; पण त्याने ऐकलं नाही. त्याला स्वतःच्या मुलीची दया आली नाही. तो तिला खूप मारहाण करायचा आणि बलात्कार करायचा. 50 वर्षीय नराधम बाप आपल्या मुलीच्या शरीराचे लचके तोडत होता. इतकंच नाही तर कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
एखाद्या मुलीबरोबर काही वाईट झाल्यास ती तिच्या वडिलांकडे जाते; पण या मुलीच्या बाबतीत तर तिच्या स्वतःच्या बापानेच बलात्कार केला. ती बापाने केलेला अत्याचार सहन करत होती. त्याहून दुर्दैवी म्हणजे बलात्कारामुळे ही 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाली होती. यानंतरही अनेक महिने ती गप्प राहिली; पण गर्भधारणेमुळे मुलीचं पोट दिसू लागलं आणि ही धक्कादायक बाब समोर आली.
पोट दिसू लागल्यानंतर तिच्या आईने तिला याबाबत विचारलं. मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. कारण तिचा पती व मुलीचाच बापच तिच्यावर बलात्कार करत आहे हे तिला कळलं. तिच्यासाठी हे सत्य स्वीकारणं खूप अवघड होतं. आपल्या मुलीची अवस्था पाहून आईही हळहळली. या आईने हिंमत न हरता पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
मुलीची रुग्णालयात तपासणी केली असता ती साडेसहा महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आलं. या मुलीवर एप्रिल ते ऑगस्टदरम्यान बलात्कार झाला होता. पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली आहे. बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराची कलमं त्याच्यावर लावण्यात आली आहेत. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा हा नराधम बाप तुरुंगात आहे; पण या धक्क्यातून मुलगी मात्र सावरू शकलेली नाही.