-- उत्तरप्रदेशमधील कानपूरमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला हे.
शहरातील प्रसिद्ध शाळेतील शिक्षिकेचा जीव १० वी तील एका विद्यार्थ्यावर जडला.
मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, महिला शिक्षक विद्यार्थ्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत आहे.
ती विद्यार्थ्यासोबत अश्लील चॅटिंग करते आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत आहे.
विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
विशेष म्हणजे शिक्षिकेचा पती व भाऊही याच शाळेत कार्यरत आहेत.हे प्रकरण केंट पोलीस ठाणे क्षेत्रातील एका खासगी शाळेतील आहे.
उन्नाव येथे राहणाऱ्या व्यक्तीने केंट क्षेत्राचे पोलीस अधीक्षक बृज नारायण सिंह यांना तक्रार पत्र दिले आहे.
त्यात त्यांनी लिहिले आहे की, त्यांचा मुलगा १० वीच्या वर्गात शिकतो.
मुलाच्या शाळेतील एक शिक्षिका रात्रभर मुलाशी फोनवर चॅटिंग करते.
त्याच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकते.
त्याचबरोबर महिला शिक्षक मुलाला धर्म परिवर्तन करण्यासाठीही दबाव टाकत आहे.
तिचा पती व भाऊही त्याच शाळेत कार्यरत आहेत.
तिघे मिळून त्याला धर्म परिवर्तनासाठी उकसावत आहेत.वडिलांनी मुला व शिक्षिकेच्या चॅटिंगचे स्क्रीन शॉटही दिले आहे.
यावर एसीपी यांनी सांगितले की, महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये झालेल्या चॅटिंगचे पुरावे मिळाले आहेत.मात्र धर्म परिवर्तनासाठी मुलावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलाने काही चॅटिंग डिलीट केली आहेत.