नवरात्रौत्सवाचा शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध नृत्यांगणा बेधुंद गौतमी पाटिल यांचा लावणीचा कार्यक्रम


गडचिरोली:-सावली तालुक्यातील व्याहाड ( खुर्द ) येये नवरात्रौत्सवाचा शुभ मुहूर्तावर सुप्रसिद्ध नृत्यांगणा बेधुंद गौतमी पाटिल यांचा लावणीचा कार्यक्रम दि. १९ ऑक्टोंबर 2023 ला रात्रौ ७ वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टिवार हे असुन आयोजक निखिलभाऊ सुरमवार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत , डॉ. नामदेव किरसान , दिनेश पाटिल चिटनूरवार ,उषाताई भोयर महिला अध्यक्ष सावली यांच्या प्रमुख उपस्थितीत सपंन्न होत आहे. तरी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.