अॅड. चंद्रशेखर चांदेकर यांनी चार वर्षाच्या कर्करोग रुग्णाला मदत करीत वाढदिवस केला साजरा
राजुरा : तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. चंद्रशेखर चांदेकर यांचा आज (दि. १२) वाढदिवस राजुरा न्यायमंदिरात साजरा करीत असताना गोंडपिपरी येथिल चार वर्षाच्या प्रणय निकोडे बालकाला पोटाचा कर्करोग झाला असून तो नागपूर येथे दवाखान्यात उपचार घेत असून त्यांना मदतीची गरज असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत असताना राजुरा तालुक्यातील प्रख्यात वकील ड चंद्रशेखर चांदेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत ती पोस्ट वाचून त्या मुलाला आर्थिक मदत करीत वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. यावेळी न्यायमंदिरात उपस्थित राजुरा येथिल पत्रकार श्रीकृष्ण गोरे यांच्याकडे सदर मदत त्यापिढीतापर्यंत पोहचविण्यासाठी सुपूर्त केली. यावेळी राजुरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. राजेश लांजेकर, सचिव ड. रविंद्र टिपले, यांचे उपस्थितीत मदत करण्यात आली. वाढदिवस म्हणजे मित्र, परिवारासाठी मोठी पर्वणी असते. पण समाजात काही असे अपेक्षित असतात की ते जीवन जगत असताना सतत संघर्ष करून एक एक क्षण काढीत आहे. अॅड. चांदेकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून वाढदिवस साध्या पद्धतीने करीत वाढदिवसाचा

खर्च कर्करोगाने पीडित प्रणय निकोडे य चार वर्षाच्या बाळाला मदत म्हणून न्यायमंदिरात राजुरा येथिल पत्रकार श्रीकृष्ण गोरे यांच्यामाध्यमातून पाठविली आहे. यावेळी राजुरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. राजेश लांजेकर, सचिव ड. रविंद्र टिपले, यांचे उपस्थितीत मदत करीत वाढदिवस साजरा केला. यावेळी राजुरा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश लांजेकर, सचिव ड. रविंद्र

टिपले, अॅड. निनाद येरने ज्येष्ठ विधीज्ञ मुरलीधर देवाळकर, सदानंद लांडे, अरुण धोटे, सुनील वज्जलवार, विजय पुणेकर, राकेश पिंपळकर, प्रविण आस्वले, मंगेश बोबाटे, विशाल उपरे, रुपाली दास, प्रशांत तेलकापल्लीवार मोहन कलेगुरवार, भीमराव दुर्गे, शंतनु देशमुख, यशवंत खोके, वंदना जाधव, पदमा मोहितकर, सामाजिक कार्यकर्ता राकेश बेत्तावार यांची उपस्थिती होती.