दुचाकी अपघातात तरुण ठार




एसआरपीएफ कॅम्प वळणावरील घटना

विसोरा (वा.). तालुक्यातील विसोरा मार्गावरील एसआरपीएफ कॅम्पजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्रो 9.30 वाजताच्या सुमारास घडली. आकाश सूर्यकांत मेश्राम ( 24, रा. पारडी, ता. लाखांदूर, जिल्हा भंडारा) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील आकाश मेश्राम हा तरुण कुरखेडा येथील आजोबांकडे राहून पोलिस व सैन्य भरतीची तयारी करीत होता. दरम्यान तो आपल्या आपल्या मित्रांसोबत दुचाकीने वडसा येथे कामानिमित्त आला होता.

काम आटोपताच वडसावरुन कुरखेडाकडे दुचाकीने जात असतांना एस आर पी ए फ कॅम्प ज व ळी ल वळणावर आकाशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात उलटल्या गेली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी मित्र किरकोळ जखमी झाला. आईवडिलांना एकुलता एक असल्याने त्याच्या अकाली मृत्यूने मेश्राम परिवारात शोककळा पसरली आहे.