घरकुल द्या..! “नाहीतर बायको दया..! कोद्री येथील ३० वर्षांच्या तरूणाची शासनाकडे मागणी


संग्रामपूर पंचायत समितीच्या कार्यालयात एका ३० वर्षीय तरुणाने बिडीओंना भेटून एक अजब /गजब मागणी केली आहे.

घर नसल्याने बायको मिळत नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे.त्यामुळे एकतर आपल्याला घरकुल द्यावे नाहीतर बायको द्यावी अशी मागणी तरुणाने केली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथील अंकुश नत्थुजी कड या तरुणाने लक्षवेधी मागणी केली आहे. अंकुशच्या म्हणण्यानुसार त्याचे नाव घरकुलाच्या यादीमध्ये ३५ व्या क्रमांकावर आहे. मागील गेल्या ५ वर्षात घरकुल योजनेतून गावात केवळ ५ घरांचे बांधकाम झाले.त्यामुळे माझा ३५ वा नंबर येईपर्यंत मी म्हातारा होईल, तेव्हा घर देता काय ?

असा सवाल अंकुशने पंचायत समिती संग्रामपूर चे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिलेल्या निवेदनातून केला आहे.

आम्हाला घर नसल्याने गावातील लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. ३० वर्षांचे वय होऊनही घर नसल्याने आम्हाला कोणी पोरगी देईना, ज्या गतीने घरकुल योजनेची कामे होत आहेत.

त्या गतीने ३५ वा नंबर यायला अजून ३०-३५ वर्षे लागतील. तोपर्यंत मी म्हातारा झालेलो असेल. त्यामुळे एकतर घरकुल द्या नाहीतर बायको द्या अशी मागणी अंकुशने सरकारकडे केली आहे.

सरकारने मागणीची दखल घेतली नाही तर मी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी आंदोलन करेल त्यामुळे जीवाचे बरेवाईट झाल्यास याला शासन जबाबदार राहील.

असे कोद्री येथील अंकुश कड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

माझे घरकुलाच्या यादीत ३५ वा नंबर, असून मागील ५ वर्षांत पूर्ण गावात फक्त ५ घरकुल झाली‌.

मग मला काय म्हातारा झाल्यावर प्रशासन घरकुल देईल काय..? असे कोद्री येथील अंकुश कड यांनी सवाल केला आहे…