दवंडी येथील घटना; परिसरात एकच खळबळ
मृताची पत्नी सरिता हिने बेडगाव पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास लखन व
पत्नी सरिता सोनार एका खोलित तर बाजूच्या खोलीत लखनचा 12 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाची मुलगी झोपले होते. दरम्यान रात्री 11 वाजताच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेल्या 6 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला. यावेळी अज्ञातांनी माझ्या व
पतीच्या गळ्यावर चाकू लावून आरडओरड करु नका, अशी धमकी दिली. यातच एकाने पतीचा गळा चिरुन हत्या केल्याचे 'मृताच्या पत्नीने सांगितले... यासंदर्भात बेडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी करीत आहेत.