गडचिरोली- मागील समापण सोहळाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बुद्ध विहार कोठरीत ( जंगल परिसर ) येथे अवैध वास्तव करणारे भन्ते भगीरथ यांनी माझा मुलगा तक्ष यांला काठीने मारहान करीत व साल्या तु बदमास आहेस असे म्हणीत त्याच्या मागे धावले.यामुळे तक्ष नाल्याच्या पाण्यात पडून बुडून मृत्यु पावला.
तरीही मरु दे साल्याला, बदमास आहे असे म्हणीत त्याला मदत केली नाही.माझ्या मुलाच्या मृत्युला भन्ते भगीरथच जबाबदार असल्याने त्यांना त्वरीत अटक करावी अश्या मागणीची तक्रार तक्षच्या आईने पोलीस स्टेशन घोट व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांना दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की,माझा मुलगा तक्ष हा नागपूर येथे ७ वीत शिकत होता.भन्ते भगीरथ यांनी माझी परवानगी न घेता त्याला फुस लावून श्रामनेर बनवितो म्हणुन बुद्ध विहार कोठरीत आणले व त्याला १० दिवसासाठी श्रामणेर बनविले.तरीही याची पुसटसी कल्पना मला दिली नाही.
भन्ते भगीरथ याच्या मारहानी मुळे माझ्या मुलगा मरण पावला.तक्ष याला माहिती न देता आणणाऱ्या भन्ते भगीरथ व मुख्याधापक नागपूर या दोघावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणीही तक्षच्या आईने केलेली आहे.
बौध्द विहार कोठरी समापण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला भन्तेच्या मारहानी मुळे पाण्यात बुडून मृत्यु पावलेल्या त्या सदर प्रकरणाच्या प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदार हजर होते.तक्षचे प्रेतच सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आणुन भन्तेनी शवविच्छेदन करायला लावून माझ्या पतीला आमिष दाखवून प्रेत वडसा येथे आणुन शवविच्छेदनच्या प्रेताला पुरावा नष्ट व्हावा म्हणुन अर्ध्या रात्रीच वैनगंगा नदीघाटावर भन्तेनी जाळले व तक्रार करू नका असे आमच्या कुटुंबाना सांगीतले.
तक्षच्या आईचे व साक्षीदाराचे बयान बाकी आहेत,बयान झाल्यानंतर कळेलच.
घटनेची सत्य हकीकत काय आहे हे चौकशीत पुढे येईल.मात्र या घटनाक्रमांकडे जनतेचे लक्ष लागुन आहे.
भन्ते भगीरथ कोठरी (जंगल ) यांना त्वरीत अटक करावी अशी मागणी तक्षची आई राहणार वडसा,हिने निवेदनाद्वारे केलेले आहे.