
दे गंज १४ । देसाईगंज येथिल भगतसिंग वार्डातिल जेतवन बौद्ध विहार या ठिकाणी आमदार कृष्णाभाऊ गजबे यांचे हस्ते १० लक्ष रुपये निधिच्या सभागृहाचे बांधकाम धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन आज १४ आक्टोबर ला करण्यात आले या प्रसंगी इंजि नुबिर फुले सागर बन्सोड देवराव धोंगडे रुपेश सुखदेवे कपिल बोरकर हरिदास घुटके प्रकाश राहाटे यांचेसह गनमाण्य व्यक्ती उपस्थित होते या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आम कृष्णा गजबे म्हणाले की , भगतसिंग वार्डातिल जेतवन बौद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य कारयक्रम प्रसंगी आलो असतांना समाज बांधवांनी या विहारालगत एक सभागृहाचे बांधकाम केल्यास समाजासाठी सोयीचे होईल अशी सुचना केली , मी लगेच प्रस्ताव तयार करुन शासनाकडे मंजुरी ला पाठविला आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन वैशिष्ठपुर्ण निधी च्या माध्यमातुन १० लक्ष रुपये निधी चे सभागृहाचे बांधकामाचे भुमिपुजन आज होत असुन या वास्तुचा बौद्ध समाज बांधवांना कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निश्चितच लाभ होईल महामानवांच्या उपकारांचे ञृण फेडणे अशक्य असुन या क्षेञाचा प्रतिनिधी म्हनुण मी सदैव बौद्ध बांधवांच्या पाठिशी राहिन अशी ग्वाही आम कृष्णा गजबे यांनी दिली .