कांदिवली येथे जिल्हास्तर डॉजबॉल स्पर्धांना सुरुवात



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई
कांदिवली, दि. ४ : आज मुंबई उपनगर शासकीय डॉजबॉल स्पर्धांना कांदिवली (प.) येथील ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणात सुरुवात झाली. १७ वर्षा आतील मुला-मुलींच्या ३६ तर १९ वर्षाआतील मुला-मुलींच्या २५ संघांनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. 
     ऑक्सफर्ड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ज्योत्सना रॉबर्ट यांच्या हस्ते स्पर्धांचे उदघाटन झाले. मुंबई उपनगर डॉजबॉल असोसिएशनचे सचिव जगदीश अंचन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे क्रीडा समन्वयक फारुख पटेल, क्रीडा शिक्षक सुधीर तिगोटे व इतर शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
     आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच प्रमुख नरेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक चौधरी, विकास बारीक, विवेक कुशवाह, ललित नवाळी, हर्षल पाटील, मनिष निराला, सुरज यादव, मनिष विश्वकर्मा, प्रथम गुप्ता व विनायक देवकर हे पंच म्हणून काम पाहत आहेत.