पती तुरुंगात अन् पत्नीचे दोघांसोबत जुळाले सूत अनैतिक संबंधातून खून प्रकरणात आरोपीला आजन्म कारावास

नांदेड जिल्ह्यातील  वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या महिलेच्या खून प्रकरणात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका महिलेचे दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध असताना, त्यातून एकाने भोसकून दुसऱ्याची हत्या केली होती. २००८ मध्ये ही घटना घडली होती आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणात निकाल देताना जिल्हा सत्र न्या. नागेश न्हावकर यांनी आरोपीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

21वर्षीय विवाहितेचा पती खून प्रकरणात तुरुंगात होता. दरम्यान, या काळात बाहेर असलेल्या त्याच्या पत्नीचे मनदीपसिंघ नानकसिंघ काटघर या तरुणाशी सूत जुळले. बऱ्याच दिवस चांगले राहिल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. पुढे मनदीपसिंघ तिला वाईट वागणूक देऊ लागला आणि मारहाण देखील करू लागला. त्यामुळे त्याच्या रोजच्या त्रासाला महिला कंटाळली होती. याच काळात महिलेची फेसबूकवरून सुरजितसिंघ उर्फ कालू लहेरसिंघ मिलवाले याच्याशी ओळख झाली. त्यानंतर महिलेचे कालू याच्याशी प्रेमसंबंध जुळले

अधिक माहितीनुसार, 23,8,2018 च्या रात्री मनदीपसिंघ हा त्या महिलेच्या घरी गेला होता.. यावेळी तिथे सुरजितसिंघ होता. सुरजितसिंघला पाहून मनदीपसिंघला प्रचंड राग आला आणि त्याने हातात तलवार घेऊन सुरजितसिंघ याला धमकावले.