लग्नाच्या दिवशी प्रियकरासोबत पळाली, नवऱ्याने घरी ठाण मांडल्यावर परत आली…नंतर केले असे कृत्य


राजस्थानच्या पाली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशी प्रियकरासोबत पळाली मात्र नवरा तेरा दिवस घरी ठाण मांडून बसल्यावर ती परत आली, त्याच्याशी लग्न गेले. काही दिवस गेल्यानंतर माहेरी जात असल्याचे सांगत ती असे काही केले की तिच्या वडिलांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. तिचे हे कृत्य परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

सेणागाव येथील एका तरुणीचे 3 मे रोजी लग्न होते. सगळ्या विंधींची तयारी सुरु होती. मात्र सप्तपदीच्या वेळी वधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. नववधू पळून गेल्याचे कळल्यावर लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांनी नववधुच्या कुटुंबियांनी तिला परत आणण्याची मागणी केली, नववधूच्या घराबाहेर वरात ठाण मांडून बसले होते. वरात तब्बल 13 दिवस तशीच थांबली होती. मात्र नववधू परत घरी आली आणि पुन्हा रितीरिवाजानुसार तिने लग्न केले आणि त्यानंतर पुन्हा प्रियकरासोबत पळून गेली.


विवाहीतेच्या पित्याने पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी 4 ऑक्टोबरला माहेरी आली होती. 6 ऑक्टोबरला घरी जाण्यासाठी सासु-सासऱ्यांना बोलावले होते. मात्र रात्री सर्व झोपल्यानंतर ती प्रियकरासोबत पळाली. आम्ही चार दिवस तिचा शोध घेत आहोत. याआधीही ती पोटदुखीचे कारण सांगून 3 मे ला पळून गेली होती. त्यावेळी 13 दिवस घरात वरात थांबली होती. 16 मे रोजी तिला घरी परत आणून लग्न केले होते. मुलीचा नवरा हा सिरोही जिल्ह्यातील कैलाश नगर येथील रहिवासी आहे. तो आंध्र प्रदेशातील एका मिठाई दुकानात कामाला आहे. नववधूच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.