गदर पिक्चर वरून सासूला केले फ्रैक्चर
सुजाब विचारत दिले ढकलून; तक्रारीनंतर गुन्हा दाखलमीरा रोड : मालमत्तेवरून वाद घालणारी सून 'गदर' चित्रपट बघायला न्या, असे सांगत पतीला मारण्यास गेली असता सासूने अडवले म्हणून तिला ढकलून पाडले. त्यात सासूच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर पूर्व, एनपी पार्कच्या स्वस्तिक इमारतीत ६३ वर्षांच्या माया गोयल या पती राजेंद्रप्रसाद (६६), मुलगा अमन आणि सून दीक्षा (२७)

असे कुटुंब राहते. राजेंद्रप्रसाद यांचे नवघर मार्गावर हार्डवेअरचे दुकान आहे तर अमन हा इमारत दुरुस्तीचे काम करतो, असे फिर्यादीत म्हटलेय.

दीक्षा आणि अमन यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली असून सासू- सासऱ्यांच्या घर, दुकान या मालमत्तेवरून गेल्या वर्षभरापासून दीक्षा वाद घालत आहे. माया आणि राजेंद्रप्रसाद हे 'गदर' चित्रपट पाहून रात्री घरी आले. तेव्हा दीक्षा हिने तुम्ही कोणाला विचारून चित्रपट बघायला गेलात, असा जाब सासूला विचारला.मला आताच्या आता चित्रपट बघायला घेऊन चला, असे तिने पतीला सांगितले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची, भांडण सुरू झाले.

संतप्त दीक्षा हिने घरातील प्लास्टिकचे टेबल उचलून पतीला मारण्यास गेली असता सासूने तिला रोखले. यावेळी तिने सासूला जोराने ढकलून पाडले आणि शिवीगाळ सुरू केली. त्यात सासू माया यांचा खांदा फ्रेंक्चर झाला. याप्रकरणी माया यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.