मुंबईत रुग्णसेवा करणाऱ्या गडचिरोलीच्या तरुणीचा मृत्यू




चक्कर येऊन पडल्याचे झाले निमित्त

 गडचिरोली:  येथे शिक्षण घेऊन  मुंबईत रुग्णसेवा करणाऱ्या तरुणीचा चक्कर येऊन पडल्यानंतर काही वेळाने बेशुद्ध होऊन मृत्यू झाला. ही घटना २६ सप्टेंबरला घडली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट असून, या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तेजस भसुराज भजगवळी (वय २५, रा. गडचिरोली) असे त्या दुदैवी तरुणीचे नाव आहे. तिने मुंबईतील नामांकित रुग्णालयातून पॅरोमेडिकलची पदवी संपादन केली होती. सध्या ती मुंबईत एका खासगी दवाखान्यात तांत्रिक कर्मचारी म्हणून काम करीत होती. २६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजता तिला अचानक भोवळ आली. डॉक्टरांनी

तपासण्या केल्या, पण तोपर्यंत ती बेशुद्ध झाली, पुन्हा ती शुद्धीवर आलीच नाही. तिला डोंबिवली  'येथील रुग्णालयात हलविले, परंतु वाटेतच प्राणज्योत मालविली.

गुरुवारी सकाळी नऊ वाजता कठाणी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मयत तेजसची एक बहीण डॉक्टर, दुसरी परिचारिका असून भाऊ बेंगालोर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील निवृत्त शिक्षक असून आई मालाबाई भजगवळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आहेत. मुलीच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.