गळफास घेउन महिलेची आत्महत्या, प्रियकराने केले विषप्राशन

गडचिरोली - शहरातील फुले वार्डात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल ८ सप्टेंबर रोजीनिदर्शनास आली. 

दरम्यान या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच चामोर्शी तालुक्यातील मुधोली येथील युवकाने विष प्राशन केले. त्याच्यावर अत्यावस्थ अवस्थेत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुवर्णा गजानन गजलवार (२७) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नांव असून विष प्राशन करणाऱ्या युवकाचे आडनाव बावणे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुवर्णा गजानन ही माहितीनुसार मुळची चंद्रपूर
जिल्ह्यातील चक बल्लारपूर येथील रहिवासी आहे. तिचे ७ वर्षापुर्वी लग्न झाले. मात्र ३ वर्षापासून ती पतीपासून विभक्त राहुन गडचिरोली येथील फुले वार्डातील सुधाकर कांबळे यांच्या घरी किरायाने राहत होती. ती दुकानामध्ये कामाला जात होती. मात्र १५ दिवसापासून कामावर जाणे बंद केले होते. अशातच काल ८ सप्टेंबर रोजी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास शेजारी नागरीकांना पंखे व लाईट सुरू असल्याचे दिसुन आल्याने जाऊन बघितले असता तिने आत्महत्या केल्याचेनिदर्शनास आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी तालुक्यातील मुधोली येथील युवकाने विष प्राशन केले. यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला अत्यवस्थ

अवस्थेत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा प्रकार लिव्ह इन  रिलेशनशिपचा असल्याचे बोलल्या जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदेश्वर हे करीत आहेत.


लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रकार असल्याची चर्चा

शहरातील फुले वार्डातील विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या करणे व या घटनेची माहिती मिळताच सबंधित युवकाने विष प्राशन करणे हा लिव्ह इन रिलेशनशिपचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे. सबंधित युवक हा युवतीसोबत राहत असल्याचेही बोलल्या जात आहे. मात्र तो बेशुद्धावस्थेत असल्याने नेमका प्रकार काय आहे ते तो शुद्धीवर आल्यानंतरच स्पष्ट होईल असे बोलल्या जात आहे.