लागोपाठ तिसरी मुलगी झाली म्हणून एका बापाने आपल्याच मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची केली हत्या


Crime News : संपूर्ण मानवतेला हादरवून टाकेल अशी खळबळजनक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून याबाबत संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावेळी बापानेच आपल्या ८ दिवशीय मुलीची हत्या केली आहे.


लागोपाठ तिसरी मुलगी झाली म्हणून एका बापाने आपल्याच मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली आहे. तर यावेळी मुलीचा मृत्यू हा आजाराने झाला असल्याचाही बनाव त्याने रचला.

२ मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगी झाली यामुळे संतप्त झालेल्या बापाने ८ दिवसांच्या मुलीच्या तोंडात कोंबून तिची हत्या केली अशी खळबळजनक बाब समोर आली आहे.


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हरीनगर तांडा येथे हि घृणास्पद घटना घडली आहे. या ठिकणी राहत असलेल्या गोकुळ गोटीराम जाधव याला २ मुलींनंतर ३री मुलगी झाल्याने तो संतप्त झाला. या रागातून त्याने आठ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिला पाळण्याच झोपवलं. काही वेळातच तिने प्राण सोडला.


नंतर या नराधम बापाने चिमुकलीचा आजाराने मृत्यू झाल्याचा कांगावा केला. मात्र परिसरातील आशा सेविकांना आणि त्यांच्या वरिष्ठांना याबाबत संशय आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही लगेच सूत्र फिरवली. गोपनिय तपास सुरु केला.

यावेळी आरोपी गोकुळ गोटीराम जाधव याने मुलीचा खून केला असल्याचे उघडकीस आले.त्याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.