भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठारराजानापल्ली गावाजवळील वळणावरील घटना

सिरोंचा - भरधाव ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ५ किमी अंतरावर असलेल्या राजानापल्ली गावाजवळील वळणावर आज ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताचा दरम्यान घडली आहे.

कंबाला राजांना (६०) रा. राजानापल्ली असे मृतकाचे नांव आहे.

प्राप्त माहितीनुसार राजानापल्ली येथील कंबाला

राजांना हा सिरोंचाकडे दुचाकीने येत असताना राजानापल्ली वळणावर ट्रकने भरधाव वेगाने दुचाकीस जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. घटना सिरोंचा - आसरअल्ली राष्ट्रीय  महामर्गावर घडली. पोलिसांना

घटनेची माहिती प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.