गोंदिया : मित्राला वापरण्यासाठी दिलेली दुचाकी घेऊनच दूसरा मित्र पसार झाल्याचा प्रकार २ सप्टेंबर रोजी समोर आला आहे.
देवरी तालुक्याच्या हरदोली येथील नितीन जगलाल खैरे (२६) या तरुणाला त्याचे भाऊजी तुलसीराम हरदे यांनी आपली मोटरसायकल क्र. एम एच ५० एम एम ४२२८ ही दिली. ती दूचाकी नितीन खैरे याने आमगावच्या आंबेडकर चौकात सोबत राहणाऱ्या मित्राला थोड्या वेळासाठी दिली असता ती मोटरसायकल घेऊन जाणारा आरोपी राजकुमार मोतीराम नेवारे (२८, रा. परसोडी ता. लांजी जि. बालाघाट) हा २ सप्टेंबरपासून आलाच नाही. तो दुचाकी घेऊन पसार झाला. नितीन खैरे याच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे रुळावर पडल्याने एक प्रवासी जखमी
गोंदिया : आमगावच्या रेल्वेस्थानकावर रेल्वे रुळावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता दाखल करण्यात आले. रुपेंद्र ईश्वरीचरण कौशल (५२, रा. पालडोंगरी, ता. लांजी) असे गंभीर जखमी असलेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.