आबे काय म्हणालास, म्हणत तिघांनी एकाला बेदम मारहाण केली





गोंदिया : मासे पकडण्यासाठी लावलेले झिंके तपासण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला अंधारात काही व्यक्ती दिसले. त्यावर येथे कोण आहेत बे, असे ओरडणाऱ्या व्यक्तीला त्याच्याच गावातील तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली.

सूरज सोमा रतनपुरे (५०, रा. मेंढा) यांनी गावातील नाल्यावर मासोळ्या पकडण्यासाठी झिंके लावून ठेवले होते. त्या झिंक्यातील मासोळ्या घेऊन घराकडे निघालेल्या सूरजला अंधारात काही लोक दिसले. त्यावर त्यांनी कोण आहेत बे, असे शब्द उद्गारले. यावर

आम्हाला अबे का म्हणाला, म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारले. एकाने काठीने मारून त्यांचे डोके फोडले. त्याला पुढेही मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात आरोपी रामा चिमना सूरसाऊत (५०), कुंजीलाल चिमना सूरसाऊत (४५), शांतीलाल चिमना सूरसाऊत (३५, तिन्ही रा. मेंढा) यांच्यावर तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.