आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात : कुटुंबीयांवर कोसळले संकट
देवरी: मनात कुठला तरी राग धरून युवकाने सोमवारी (दि. २५) रात्रीच्या सुमारास घरच्यांना मी आत्महत्या करायला जातो, असे सांगत घराबाहेर पडून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी देवरी येथे उघडकीस आली. सागर राजनकर (२६, रा. देवरी) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सागर हा देवरी येथील कुमार वाईन शॉप येथे कामाला होता सोमवारी रात्री १२
वाजता तो घरून रागारागात मी आत्महत्या करायला चाललो, असे सांगत घराबाहेर पडल्याची माहिती आहे. दरम्यान, सागर घराबाहेर पडल्यानंतर थोड्याच वेळात त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले; पण त्यांना सागरचा पत्ता लागला नव्हता. कुटुंबीयांनी याची
माहिती देवरी पोलिसांना दिली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धुकेश्वरी मंदिर
दरम्यान तो परिसरातील पवन तलावात गड टाकून सागरचा रात्रीच शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, मंगळवारी सकाळी पवन तलावात सागरचा मृतदेह आढळला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हवालदार करंजेकर करीत आहे.