तुम्ही गुलाम बनत आहात.


     बॅंक ऑफ महाराष्ट्र, जळगाव शाखेत राज्य सरकारचे पेन्शरचे खाते आहेत.एम जे कॉलेज जवळ शाखेत ८।९।२०२३तारखेला ११वाजेपासून वीस खातेदारांची काऊंटर वर लाईन लागली होती.जेष्ठ महिलांनी तर लाईन सोडून बाकावर फतकल मारली.महिलांनी येथेच पराभव स्वीकारला.आता काहीच करू शकत नाही.बसा,वाट पाहात. ज्या मोदींनी हे इंटरनेट व्यवहार सक्तीचे केले , ऑनलाईन केले त्यांचा तर फोन नंबर सुद्धा नाही.आम्ही तर या माणसाला ,यांच्या माणसाला मत देऊन अपराध केला कि, मुर्खपणा?आता यांचा खासदार गेला असेल तेल आणायला.आमदार गेला असेल दारू आणायला.मंत्री गेला असेल कोण्या सटवीकडे.आम्ही लाळ गाळत बसायचे बॅंकेत. पुरूषांनी मात्र लाईन मोडली नाही,सोडली नाही.पैसा काढायचा होता.अधूनमधून दोन तीन व्यवहार घडत होते पण पुन्हा चार पाच माणसे लाईनीत वाढत होती.कारण सांगितले,कि, इंटरनेट प्रोब्लेम आहे.सर्व्हर डाऊन आहे.
    या आजारावर कोणाकडेही इलाज नाही.शिवाय नरेंद्र मोदी.दोन काऊंटर पैकी एक चालू,दुसरा बंद.जरी इतर पांच कर्मचारी गणमण करीत टाईमपास करीत होते.एक गरोदर महिला बिचारी कसेतरी उत्तरे देत होती.आणि गरोदर नसलेले पुरूष कागदे चिवडत होती .म्हटले,का हो, गर्दी आहे तर दुसरे काऊंटर चालू करा.म्हणे नाही!तो माणूस सुटीवर आहे.बोला,येथे काय करणार?यावर नरेंद्र मोदींचे लक्ष नाही.ते फक्त बायडन च्या हातात हात धरून उभे आहेत.तोंडाजवळ तोंड नेऊन गुलू गुलू बोलत आहेत.होनो लूलू बाबत चर्चा करीत होते.
      मी म्हटले,जर इंटरनेट प्रॉब्लेम आहे तर जुनी पद्धत प्रमाणे खाते वही पाहून पैसा वाटप करा.म्हणे नाही, आम्ही तसे खाते वही लिहीत नाहीत.बाप रे! रेकॉर्ड गायब!विचारले,का हो साहेब,यावर इलाज काय?म्हणे ,काहीच नाही.आता घरी जा.मधे दोन दिवस सुट्टी आहे.सरळ सोमवारी या.तर मग,मला प्रश्न पडला.सोमवार तरी आहे काय,या महिन्यात?नसला तर बोंबला.
      तीस पस्तीस वर्षे नोकरी केली.कोणी मुर्ख म्हणत असेल,सेवा केली.पण या वयात पैसा लागत असेल तर पेन्शन शिवाय पर्याय नाही.तर करायचे काय? आता पुन्हा निराश,हताश,उदास,भकास व्हायची वेळ येऊन ठेपलेली आहे.कारण सांगितले, इंटरनेट बंद आहे.कुठे आहे हे इंटरनेट?म्हणे ते हवेत आहे.आमचे पैशांचे व्यवहार आता हवेत.अजूनतरी जेवणाचे आणि संसाराचे व्यवहार हवेत केले नाहीत.सनकी माणसाला पुन्हा निवडून दिले तर आणि ते ही हवेतच केले तर स्वयंपाक करायची गरज पडणार नाही.बायको सासरला येणारच नाही . इंटरनेट चा हा परिणाम होऊ शकतो.सर्वच ऑनलाईन.ऑनलाईन म्हणजे हवेत.क्रिप्टो करंसी.ही क्रेस्टो करंसी.
      सर्वांचा बाप इंटरनेट !बाप रे!हे इंटरनेट कोण आणू शकतो?कोण पकडू शकतो? कोणाच्या हातात आहे,त्याची कमांड? नाही आले तर आम्ही काय खायचे?हे तर भयानक संकट येऊन ठेपले आहे.
     जर हे इंटरनेट कोणी सुलतानाने कायमचे बंद केले तर!हे इंटरनेट इंटरप्ट केले तर!हे इंटरनेट जॅमर लावून अडवले तर!तर मग,बाया माणसांचे जीवनावर सुद्धा जॅमर लागू शकतो.३७०कलम रद्द केले त्या दिवशी असेच इंटरनेट बंद केले होते.नरेंद्र मोदींनी.बॅंकेचे सर्वच व्यवहार बंद पाडले होते.जर सुलतानाच्या अंगात हिटलर शिरला आणि वाटले कि, आजपासून इंटरनेट बंद! पुरा भारत मेरी मुठ्ठीमे.तर काय करणार? जळगाव च्या कोणत्या इंजिनिअर,टर्नर,फिटर,प्लंबर कडे याचा इलाज आहे? दारू पिऊन बधीर व्हावे तर तेथेही पैसा नसेल तर मिळणार नाही.विष खाऊन जीव द्यावा तर कोणी दुकानदार फुकट देणार नाही.उरते काय? राममंदिराच्या पायरीवर बसून राम राम राम म्हणत राम सोडणे.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव