आष्टी:-
आपल्या मुधोली चक नं २ स्वगावावरुन कर्तव्यावर गडचिरोली कडे जात असताना अड्याळच्या वळणावर अज्ञात वाहनाने दुचाकी क्रं एम एच ३३ एन ०१५९ ला जब्बर धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस प्रणय वाडके रा. मुधोली चेक ०२ यांचा अख्खा मेंदूच बाहेर पडला त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले.
पोलीसांना घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस व चामोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल होउन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चामोर्शी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाचा आष्टी पोलीस शोध घेत आहेत. सदर मृतक पोलीसास दोन मुले, पत्नी, आई वडील व बराच आप्तपरिवार आहे