धानोरा : नात्यातील - व्यक्तीला रक्त देण्यासाठी गेलेल्या युवकाचे प्रेतच तब्बल बावीस दिवसांनी मिळाल्याने परिसरात शोककळा पसरलेली आहे. राकेश दामजी कोरेटी (२७ )रा. तुकुम ता. धानोरा असे मृतक युवकाचे नांव आहे.
प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी तथा धानोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तुकूम येथील राकेश कोरेटी हा १८ ऑगस्ट रोज शुक्रवारला रिश्तेदारांमधील व्यक्तीला ब्रह्मपुरी येथील दवाखान्यात रक्त देण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो परत आल्याचे पण गावाजवळील गावात असल्याचे त्याने भ्रमणध्वनी द्वारे १९ ऑगस्ट रोज शनिवारला घरातील व्यक्तींना सांगितले.
जवळच असल्याने तो घरी परत येईल असा अंदाज घरी असलेल्या आई व राकेशच्या भावाला वाटले. मात्र काही काळाने त्याचा मोबाईलवरील संपर्क खंडीत झाल्याने त्यांना शंका वाटू लागली. या कालावधीत स्पष्ट झाले. पुरपरिस्थिती निर्माण झाली होती... कुटूंबियांचा त्याच्याशी संपर्कच न झाल्याने परिसरात व संबंधितांकडे शोधाशोध केल्यानंतर कुठेच पत्ता न लागल्याने अखेर धानोरा पोलिस ठाण्यात सदर प्रकाराबाबत माहिती देण्यात आली होती. राकेश हा कुठेतरी रिश्तेदारांकडे गेला असेल आज ना उद्या येईल असे घरच्यांना वाटू लागले होते.
मात्र आज ८ ऑगस्ट रोजी लेखा परिसरातील नदी शेजारी प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. ही बातमी कळताच परिवारातील आई व मृतकाचा भाऊ तसेच गावकरी त्या प्रेताच्या शोधासाठी गेले असता सदर युवक हा राकेश असल्याचे स्पष्ट झाले
धानोरा पोलिसांनी चौकशी करून धानोरा येथे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबाकडे सोपवण्यात आले असून अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत.
या घटनेमुळे धानोरा परीसरात हळहळ व्यक्त केली