दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने अपघात, महीलेचा मृत्यू , दोन जख्मी



सिंदेवाही तालुक्यातील घटना

सिंदेवाही :-

नागभीड भुयार येथील लवकेश रेचनकार वय 34 वर्षे, पत्नी मिनाक्षी रेचनकार वय 29 वर्षे, व मुलगी मनस्वी रेचनकार वय 6 वर्षे हे भुयार वरुन सिंदेवाही मार्गे पाथरी चक विरखल येथे राखी सनानिमित्य दुचाकी वाहनाने जात होते. परंतु सिंदेवाही मेंढा माल जवळ लवकेश रेचनकार याला चालु वाहनांवर चक्कर आली. खर्रा खाल्ल्यानं चक्कर आली असं सांगितलं जात आहे. चक्कर येताचं वाहनाचं संतुलन बिघडले आणि तिन्ही रस्त्यावर पडलेत यात मिनाक्षी रेचनकार महीलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी मनस्वी रेचनकार ही गंभीर जखमी झाली आहे.

लवकेश रेचनकार व मुलगी मनस्वी रेचनकार ह्यांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी सिंदेवाही पोलीसांनी दाखल करण्यात आले. परंतु मुलगी मनस्वी रेचनकार हिची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ १०८ ॲम्बुलन्सनी हलविण्यात आले.

 लवकेश रेचनकार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने सिंदेवाही येथे उपचार सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत .