*मुंबई दि (प्रतिनिधी) कर्जापोटी राज्यातील बहुतांश लोक कर्जबाजारी झाले असून आत्महत्तेचा मार्ग अवलंबवतात या आत्महत्या थांबवायच्या असतील, राज्यातील मानुस जगवायचा असेल तर शासनाला सरसकट कर्ज माफी करावी लागेल असा मनोदय एस.एम फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.*
कर्जबाजारी पणा मुळे राज्यातील बहुतांश संसार मोडकळीस आलेत तर असंख्य संसार संपले आहेत. अश्या अवस्थेत सरकार नको ते उपक्रम राबवत आहे. नको त्या उत्सवाला आर्थिक खतपाणी घालण्या पेक्षा बळीराज्यासह सरसकट महाराष्ट्र राज्य कर्जमुक्त करावं. शासनावर दबाव गट निर्माण करूण महाराष्ट्र कर्जमुक्त अभियान राबवत असून बहुसंख्येने अभियानात सामील व्हावे असे संस्थेच्या सचिव कुमारी संध्याताई शेळके यांनी सांगितले.
कर्ज मिळवल्या नंतर कुणाला परतावा करण्यास विलंब होत असेल. किंवा हप्ते थकले असतील तर कर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र बँका कर्ज वसुली साठी कर्जदाराचा मानसिक छळ करतात हें आर बी आय च्या मार्गदर्शक नियमावलीच्या विरोधात आहे. खाजगी स्वरूपात नेमलेले वसुली कंपन्याचे प्रतिनिधी गैरवर्तन करतात. यावेळी तात्काल संबंधित बँक व्यवस्थापक व RBI ला लिखित स्वरूपात तक्रार करावी किंवा संस्थेच्या प्रतिनिधीला कळविण्यात यावे असेही कु. संध्याताई शेळके यांनी आवाहन केले आहे.