गणेश विसर्जन करताना एका युवकाचा बुडून मृत्यू


चंद्रपूर : जिल्हात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन आज झाले. मात्र या दरम्यान एक दुःखद घटना पुढे आली आहे. गणेश विसर्जन करताना एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जिल्हात घडली. सुमित बाळा पोंगळे (वय 20) असे मृतक युवकाचे नाव आहे. ही घटना म्हातारदेवी -शेंनगाव तलावात घडली. या घटनेने विसर्जनाचा हस्तहाला गालबोट लागले असून शहरात शोक कडा पसरली आहे.

घुग्घुस येथील साईनगर वार्डात राहणारे दत्तात्रय मस्के यांचा घरी गणरायाची स्थापना करण्यात आली होती. आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हात असणारा सुमित बाळा पोंगळे हा त्यांचा भाचा आला होता. आज (गुरुवार) विसर्जन करण्यासाठी संपूर्ण परिवार व नातेवाईक म्हातारदेवी - शेंनगाव रस्त्यावरील तलावात गेले होते. गणरायाची विधिवत पूजा, आरती करून तलावात विसर्जन करण्यासाठी सर्व उतरलेत. विसर्जन झाल्यावर बाळाने डुबकी मारली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.

तलावात जेसीबीने खोल खड्डे खोदल्या गेले होते. या खड्यात बाळा फसला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती घुग्घूस पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांना देण्यात आली. पोलीसानी घटनास्थळ गाठुन मासेमाऱ्यांना बोलाविले. शोध मोहिमे दरम्यान त्याचे प्रेत आढळून आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार आसिफ राजा शेख हे करीत आहे. विसर्जना दिवशी पाहुण्याचा मृत्यू झाल्याने पोंगळे व मस्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.