वाघाच्या हल्ल्यात गाय ठार


मोटेगाव जंगल परिसरातील घटना
ब्रम्हपुरी : वनविभागाच्या वनपरिक्षेत्र तळोधी अंतर्गत येत असलेल्या मोटेगाव येथील वनात एका मोट्या पट्टेदार वाघाने गायींवर हल्ला करून दि. २५ ला ठार केली त्या गायीचे शोध फुटक्या तलावाजवळ असलेल्या जंगल परिसरात दि २६ ला लागले असून सदर गायीचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मोटेगाव येथील योगेश दशरथ सुकारे

यांच्या मालकीची गाय इतर जनावरांना सोबत चरायला गेली. मात्र रात्र होऊनही ती परत आली नाही म्हणून गाय मालकांनी शोध घेतला असता दि. २६ ला फुटक्या तलाव परिसरातील जंगल क्षेत्रात कक्ष क्र ३४ मध्ये आढळून आली. सदर गायीला मोट्या वाघाने मारल्याचे स्पष्ट दिसत होते. अशी माहिती मिळताच वनविभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्र क्षेत्रासाहायक रासेकर वनरक्षक पाटील सहायक ननावरे यांनी घटनास्थळ गाठून मृत गायीचा पंचनामा केला. सदर गायीच्या मृत्यूने मालकाचे खूप मोठे नुकसान झाले असून तात्काळ वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.