भाच्याच्या प्रेमात वेडी झाली होती मामी, सोबत मिळून केली पतीची हत्या

Crime news : यूपीच्या बरेलीमध्ये मामी प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने आपल्या मामाची हत्या केली. पोलिसांनी आरोपी भाचा, त्याचे साथीदार आणि मामीला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, ज्या व्यक्तीची हत्या झाली, त्याच्या पत्नीचं मानलेल्या भाच्यासोबत अफेअर सुरू होतं. मामी, भाचा आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मामाची हत्या केली. त्यांनी 20 सप्टेंबरला रेल्वे रूळावर मामाला झोपवलं आणि त्याची हत्या केली. 

बरेलीच्या फतेगंज पूर्वमधील ही घटना आहे. इथे आरती नावाच्या महिलेचं आपला मानलेला भाचा मानवेंद्रसोबत अफेअर सुरू होतं. यामुळे आरती आणि तिच्या पतीमध्ये नेहमीच वाद होत होता. मग भांडण इतकं वाढलं की, आरतीने मानवेंद्र आणि त्याच्या साथीदारांसोबत मिळून पती रामवीरची हत्या केली.


गेल्या आठवड्यात रामवीरचा मृतदेह रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेला सापडला. आधी पोलिसांना वाटलं की, रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला असेल, पण भावाच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसही हैराण झाले. पोलिसांना समजलं की, रामवीरच्या पत्नीचं मानलेला भाचा मानवेंद्रसोबत अनेक वर्षापासून अफेअर सुरू होतं. याच आधारावर चौकशी सुरू झाली तेव्हा हत्याकांडाचं कारण समोर आलं.

पोलिसांनी सांगितलं की, आरतीच्या सांगण्यावरून मानवेंद्रने रामवीरला बोलवलं आणि त्याला दारू पाजून बेशुद्ध केलं. यानंतर त्याला रेल्वे रूळावर टाकलं. ज्यामुळे रामवीरचा मृत्यू झाला. जेव्हा पोलिसांनी आरती आणि मानवेंद्रला ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी खोटं सांगितलं होतं. नंतर त्यांनी गुन्हा कबूल केला.


आरतीने सांगितलं की, रामवीर तिला त्रास देत होता. तो तिला आनंदी ठेवत नव्हता आणि तिला मानवेंद्रसोबत रहायचं होतं. याच कारणाने तिने मानवेंद्रसोबत मिळून त्याची हत्या केली. यात मानवेंद्रच्या साथीदारांनी मदत केली. सध्या तिघांनाही अटक केली आहे.