पतीला सोडून गर्भवती महिलेने तरुणीशी केलं लग्न




उत्तर प्रदेशराज्यातील बदायूंमध्येएकखळबळजनक प्रकार समोर आला आहे.
येथे एकागर्भवती महिलेने पतीला सोडून चक्क एका तरुणीशी मंदिरात लग्न केले.
या अनोख्या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.एका कपड्याच्या दुकानातकाम करताना दोघींमध्ये चांगली मैत्री झाली.
कालातंराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
दरम्यानसोशल मीडियावर दोन महिलांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे.समलैंगिक विवाहाचे हे प्रकरणबदायूं जिल्ह्यातील दातागंज कोतवाली क्षेत्रातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन वेगवेगळ्या गावात राहणाऱी तरुणी वगर्भवती महिलापरिसरातील एका कपड्याच्या दुकानात एकत्र काम करत होत्या.
यावेळी दोघींमध्ये चांगली मैत्री झाली.
त्यानंतर दोघी एकमेकींवर प्रेम करू लागल्या.
आपले प्रेम कायम ठेवण्यासाठी दोघींनीबरेलीशहरातील एकामंदिरात विवाह केला.
त्यांनी कुंकू लावतानाचा ववरमालाघालतानाचे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत.
जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.याचे फोटो व्हायरल झाल्यानंतरदातागंजमध्येसमलैंगिक विवाहावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.
ही महिला विवाहित असून सध्या ती गर्भवती आहे.
असेही म्हटले जात आहे की,समलैंगिकता गुन्हा नाही, मात्रसमलैंगिक विवाहाबाबत अजून कोणताही कायदा बनवला गेला नाही.याबाबत पोलिसांनी सांगितले की, या प्रकाराविषयी त्यांना कोणतीही सूचना मिळालेली नाही.
याविषयी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.
जर कोणी तक्रार केली तर चौकशी केली जाईल.२०१८ मध्ये सरकारनेसमलैंगिक संबंधांना मान्यता दिली होती.सुप्रीम कोर्टाने २०१८ मध्ये समलैंगिक संबंधांबाबत लावण्यात येणारे आयपीसीकमल ३७७ ला गुन्ह्याच्याश्रेणीतून बाहेर काढले होते.
मात्रसमलैंगिक विवाहबाबत अजूनही वाद सुरू आहे.
याबाबत अजून कोणताही कायदा किंवा आदेश जारी केलेला नाही.