वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 एटापल्ली:  येथून दोन किलोमीटर अंतरावरील भांडारकर नाल्याजवळ वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना २७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता घडली.

महादेव कोमठी मज्जी (३६, रा. भामरागड टोला) असे मयताचे नाव आहे. तो एटापल्ली-गट्टा मार्गावरील नाल्याजवळ त्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला दुचाकीचा समोरील भाग चक्काचूर झालेला आढळला. त्यामुळे त्याला धडक देऊन वाहन सुसाट गेल्याचा अंदाज आहे. या मार्गावरून सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची रेलचेल असते. या ट्रकने त्यास धडक दिल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला असून उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांकडे सोपविला जाणार आहे.