सावली वनपरिक्षेत्रातील शिर्शी बिटातील घटना
सावली (वा.). जंगलात जनावरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याचे घटना गुरुवारी सावली वनपरिक्षेत्रांतर्गत व्याहाड खुर्द उपवन क्षेत्रातील शिर्शी बिटात घडली. रामदास बोरकुटे (55) रा. जीबगाव असे जखमी गुराख्याचे नाव आहे.
रामदास बोरकुटे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे चराईसाठी जंगलात गेला होता. दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने रामदासवर हल्ला चढवला. त्याने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक धावून आले. त्यानंतर वाघ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमीला उपचाराकरिता येथील सावली येथील ग्रामीण रुग्णालयात
आणण्यात आले असून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. घटनेचा पंचनामा करण्याकरिता शिर्सी बीटाचे वनरक्षक मुंडे यांनी जखमीची भेट घेतली. या परिसरात वाघाचा सतत वावर असल्याने शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्यप्रण्याच्या दहशतीने शेतात जायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला असून वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
हत्तीने घातला धुमाकूळ
मागील पंधरवड्यापूर्वी याच परिसरात हत्तीने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसा केले होते. हत्ती त्यापाठोपाठ वाघाच्या दहशतीने शेतकन्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.