सामाजिक नैतिकतेचे भान ठेऊन विसर्जन तथा मिरवणूक दरम्यान दंगा धोपा होऊ नये यांची काळजी घ्यावी* पोलीस दक्षता पीपल असोसिएशन चे प्रदेश सचिव मनोज ढोरे यांचे आवाहन

   
दरवर्षीप्रमाणे यंदाही देसाईगंज तालुक्यात प्रत्येक गावामध्ये गणेश उत्सव साजरा होत आहे आज गोपाळकाला व उद्या जय्यत विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये कसलाही दंगा धोपा होणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळातील सदस्य मंडळी यांनी घ्यावे शांतता सुव्यवस्था अबाधित राखून गणेश जी ची मिरवणूक काढण्यात यावी.


    त्याचप्रमाणे प्रत्येक विसर्जन स्थळावर कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता सर्व भक्तगणांनी आणि गावागावातील मंडळांनी घ्यावी असे नम्र आवाहन पोलीस दक्षता पीपल असोसिएशनचे प्रदेश सचिव मनोज ढोरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून मंडळांना विनंती केलेली आहे