पत्नीविरोधात दाद मागण्याचा पतीलाही अधिकार
पुरुषांच्या कादेशीर हक्कांबाबत जागरूकता वाढविणे आवश्यक


 कोणत्याही वैवाहिक नात्यामध्ये काही वाद झाल्यास असे आढळून येते की, त्या कुटुंबातील स्त्री कायद्याचा आधार घेत आपला जीवनसाथी अथवा त्याच्यासह त्या घरातील अन्य सदस्यांविरोधात न्यायालयात दाद मागते. मात्र, एखाद्या विवाहित पुरुषाची पत्नी त्याला त्रास देत असेल तर अशा पुरुषालाही न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे.

जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा त्यांच्यासाठी आणि दोन्ही

कुटुंबांसाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो. त्याचवेळी बहुतेक जोडपी त्यांचे नाते चांगले सांभाळतात. परंतु अनेक जोडप्यांमध्ये मारामारी, वाद अशा परिस्थितीत पतीच्या छळानंतर पत्नी कायद्याचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. वास्तविक,


महिलांना राज्यघटनेत असे अनेक अधिकार दिलेले आहेत, ज्याद्वारे त्या न्यायालयात जाऊन न्याय मिळवू शकतात. पण अशा स्थितीत प्रश्न पडतो की नवऱ्यांचे काय ? त्यांना असे काही कायदेशीर अधिकार आहेत का ? तर याचे उत्तर होय असे आहे.


पुरुषांनादेखील अनेक कायदेशीर अधिकार आहेत. यामध्ये पती आपल्या पत्नीबद्दल तक्रार करू शकतो आणि कोर्टात सर्वकाही बरोबर आढळल्यास त्याला न्यायही दिला जाऊ शकतो. जर एखाद्या पतीने आपल्या पत्नीविरुद्ध कायदेशीर मदत मागितली तर तो हिंदू विवाह कायद्यांतर्गत पत्नीकडून भरणपोषणदेखील घेऊ शकतो. तथापि, हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा पत्नी काम करते. याशिवाय पत्नीप्रमाणेच पतीही घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल करू शकतो. तसेच स्वतः निर्माण केलेल्या मालमत्तेवर पतीचा अधिकार आहे.