१२ वर्षीय मुलास जिवे मारण्याचा प्रयत्न फसला, आरमोरी तालुक्यातील शिवणी बु. येथील घटना


कासवी- आरमोरी तालुक्यातील शिवनी (बु) येथे आपल्या आजोबाकडे वास्तव्यास असलेल्या १२ वर्षीय मुलास जिवे मारण्याचा प्रयत्न फसल्याची घटना काल १९ सप्टेंबर रोजी निदर्शनास आली. यामुळे परीसरात खळबळ निर्माण झाली आहे. त्याला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बारा वर्षीय अनुराग शरद ठाकरे हा मुळगाव चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील गणेशपुर येथील रहिवासी असुन त्याचे आजोबा भगवान दोनाडकर यांच्याकडे शिवनी (बु) येथे राहून शिवणी बु. जि.प.उच्च प्राथमिक शाळा इयत्ता सातवीमध्ये शिक्षण शिक्षण घेत आहे...

काल १९ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घरी आजी, आजोबा, मामा घरी नसतांना कुणीतरी अज्ञात इसम घरी वाट बघत होता.

अनुराग हा बाहेरून घरात प्रवेश करताच अज्ञात इसमाने अनुरागला घरातील दुसऱ्या रुममध्ये गुंगीचे औषध चारुन त्यांच्या तोंडात रुमाल दाबून व होती. त्याला खुर्चीवर हात पाय बांधून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण अज्ञात इसमाला शेजारच्या बाजुस कुणाचीतरी चाहूल लागताच अज्ञात इसम पळून गेला. यावेळी अनुरागचे आजी-

आजोबा हे शेतावर गेले होते. मामा आरमोरी येथे काही कामानिमित्त गेला होता. काही वेळातच अनुरागचा मामा प्रशांत हे घरात येताच करताच अनुराग हा मधल्या रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. घराचा समोरचा आणि मागचा दरवाजा उघडा असल्याने त्यांना अनुचित घटनेची शंका आली.

अनुराग हा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे लक्षात येताच, लगेच त्याला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भरती करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. असाच काहीसा प्रकार तीन महिन्यांपूर्वीही अनुराग वर बेतला होता. गणेशपूर येथे आपल्या आई- वडिलांकडे असताना अज्ञात इसमाने अनुराग हा घरी एकटा पाहून अनुरागच्या वडिलांनी पोलीस पाटील पदासाठी भरलेल्या कागदपत्रांची मागणी केली होती. परंतु वडिलांचे कागदपत्रे न दिल्याने अनुरागला तीन महिन्यांपूर्वी बेदम मारहाण केली.

सध्या ब्रम्हपुरी येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे त्याने सदर प्रतिनिधीस सांगितले.