बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमीकुरखेडा (ता. प्र.). तालुक्यात सध्या रानटी हत्ती, वाघ, बिबट्याची दहशत दिसून येत आहे. शनिवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चांदागड- सालईटोला गावाजवळील शेतशिवारात शेतात काम करीत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चेतन नारायण दुगा (16) रा. सालईटोला ता कुरखेडा असे जखमी युवकाचे नाव आहे राप्त माहितीनुसार, शनिवारला चेतन दुगा हा 

आपल्या शेतात काम करीत होता. यावेळी जवळच्या शेतातही शेतकरी व मजूर काम करीत होते. दरम्यान, चेतनची शेती जंगलाला लागून असल्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने चेतनवर हल्ला केला. यावेळी चेतनने जवळच असलेल्या काठीच्या मदतीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला. चेतनने आरडाओरड करताच बाजुच्या शेतात काम करीत असलेले शेतकरी वमजूर घटनास्थळाकडे धावले. त्यामुळे बिबट्याने जंगलात धूम ठोकली. जखमी चेतनला तत्काळ कुरखेडा येथील शेतकरी व मजूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दरम्यान, चेतनची शेती जंगलाला लागून वनविभागाचे कर्मचारी खैरीचे वनरक्षक अविनाश कुमरे, गोठणगावचे वनरक्षक के. एस. ठीकरे व वन कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.