राजली येथे रिपाईची बैठक संपन्न.


गडचिरोली _ गडचिरोली तालुक्यातील राजुली ( पोटेगांव ) येथील वाचनालयात सरपंच पंकेश कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर याच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुजुमकर , बामसेफ चे भोजराज कान्हेकर डॉ. विजय रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. राजुली गांव पुराच्या पाण्याखाली आला असता रिपाइंने सहकार्य करून शासनाला सर्व्हे करण्यास भाग पाडले होंते , राजुली पुर्नवसनाची समश्या शासन दरबारी रेटून धरण्याचे काम रिपाई करणार आहे. रिपाई पक्ष वाढीस सहकार्य करावे असेही प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगितले . यांपसगी कान्हेकर सरांनी सांगीतले की संविधान हे महत्वाचे आहे. सविधान आहे तर आपण आहोत. आज संविधान वाचविण्याची आज गरज आहे. यासाठी बहुजनाची एकजुट दाखवणे गरजेचे आहे. सरपंच कन्नाके यांनी राजुली गावाचे पुर्नवसन करणे आहे. कारण दरवर्षी पुराच्या तडाक्यामुळे नागरिकांची अथोनाथ नुकसान होते. बैठकीला धनराज दामले' भीमराव मेश्राम, भीमराव दुर्गे , प्रफुल चिरम लवार , पुंजीराम बावणे , देविदास तुंकलवार , धनराज कंकलवार , मनोहर मडावी , अमोल टोकणवार , प्रणय जनबधु , लिलाबाई अलोणे , इंदुबाई दामले, ताराबाई वाकडे आदिसहीत बहुसंख् कार्यकर्ते उपस्थित होते.