अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जखमीकुरखेडा ते कोरची दरम्यानची घटना

कुरखेडा (श. प्र. ). कुरखेडावरून कोरचीकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना बुधवारला सकाळच्या सुमारास घडली. किसन मडावी रा. शिकारीटोला व जगन दर्रो रा. सातपुती अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार किसन मडावी व जगन द हे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे काही कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते दुचाकीने कोरची तालुक्यातील सातपुती येथे जात होते. यावेळी कोरची घाटावरील वळणार अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. बराच वेळ जखमी अवस्थेत दोघेही पडून होते. दरम्यान, आज मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कोरची येथे

आढावा सभा असल्याने कोरचीचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे हे याच रस्त्याने जात होते. त्यांनी अपघातस्थळी वाहन थांबवून 108 रुग्णवाहिकेला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नेटवर्क नसल्याने फोन लागू शकला नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही जखमींना स्वतःच्याच वाहनात बसवून उपजिल्हा रुग्णालय कोरची येथे भरती केले. दोघांवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे..