वैरागड येथील शेतकऱ्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग; सेंद्रिय पध्दतीने पिकवली शेती






 वैरागड:  निसर्गनिर्मित खत, गांडूळ : खत, टाकाऊ पदार्थापासून खत, हिरवळ, जैविक आदींपासून नैसर्गिक खताची निर्मिती शास्त्रशुद्ध पद्धतीने करून वैरागड येथील शेतकरी सुभाष हर्षे हे पाच एकर शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करीत आहेत. एकाही पैशाच्या रासायनिक खताची मात्रा न वापरता नव्या शेतीचा मंत्र जपला आहे. या नव्या शेतीकडे शेतकऱ्यांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे.

वैरागड येथील शेतकरी सुभाष हर्ष यांनी मागे चार वर्षांपासून सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. सेंद्रिय शेतीत यशस्वी प्रयोग करत सुरुवातीची दोन वर्षे अपेक्षित उत्पादन आले नाही. पण
रासायनिक खताचा न वापर झाल्यामुळे खताची बचत होत असल्याने शेतीत तोटा झाला नाही. वापर करीत आहेत. शाश्वत शेती निसर्गातील विविध तत्त्वांवर आधारित आहे. या पद्धतीत रासायनिक खतांचा वापर अत्यल्प करून अथवा टाळून सेंद्रिय पदार्थाचाअधिक वापर करतात. काडीकचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमूत्र यांचा यांचा वापर करीत आहे.

सेंद्रिय खताची निर्मिती मी स्वतः करतो. धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास निंबोळी अर्काची फवारणी केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यासाठी शेताच्या कडेला कडुनिंबाची झाडे लावून घेतली. तसेच पक्ष्यांचा निवारा राहिल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यासाठी शेताच्या बांधावर झाडे आवश्यक असतात.

-सुभाष हर्ष, शेतकरी