डोंगरतमाशी येथे वर्ग 4 अन् एक शिक्षक


डोंगरतमाशी
आरमोरी प. स. अंतर्गत येणाऱ्या जि. प. शाळा डोंगरतमाशी येथे इयत्ता १ ते ४ वर्ग असुन एकुण विदयार्थी १५ आहेत. मात्र शाळेत एकच शिक्षक असल्याने विदयार्थ्यांचा विकास खुंटलेला आहे.
शिक्षण हा प्रतेक विदयार्थ्यांचा मुलभुत अधिकार असतांना सुद्धा सरकार कडून या नियमाची पायमल्ली केली जात आहे.
एकच शिक्षक असल्याने ४ वर्ग सांभाळने खुप कठीण काम आहे. त्यातल्या त्यात वारंवार शासकीय मिटींगला हजर रहावे लागते त्यामुळे शाळा बंद ठेवण्यात येते किंवा सकाळी च भरवावे लागते. अशी भीषन समस्या डोंगरतमाशी येथील जनतेची आहे. त्यामुळे विदयार्थ्यांचा विकास पूर्णपणे खुंटत आहे.
डोंगरतमाशी वासीयांकडुन शासनाला नम्र विनंती आहे की येत्या १ महीन्यात नविन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा शाळा बंद आंदोलन केले जाईल असा इशारा डोंगरतमाशी वासीयांनी दिला आहे