19 वर्षीय युवतीचा कार्यालयात काम करणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीने केला विनयभंग


चंद्रपूर :- शहरातील नामांकित ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात काम करणाऱ्या 19 वर्षीय युवतीचा त्याचा कार्यालयात काम करणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शहरातील नामांकित ट्रॅव्हल असलेल्या एका कार्यालयात काम करणारी मुलगी कार्यालयात एकटी असतांना 60 वर्षीय इसम कार्यालयात आला आणि पार्सल त्या युवतीकडे सोपवून ‘कस्टमर आले की त्याला हे पार्सल देऊन दे’ असे बोलुन गेला, परत येत त्याने कार्यालयातील लाईट बंद करून त्या युवतीचा विनयभंग केला.


चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित युवतीने गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी मिलिंद सातपुते वय 60 वर्ष या आरोपीला ताब्यात घेतले आहे.

बाहेरगावातून चंद्रपूर शहरात काम करणाऱ्या युवतींवर असे प्रकार घडत असल्याने, बाहेर गावातून चंद्रपूर शहरात काम करून शिक्षण घेणाऱ्या युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.