आईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही पडली वाईट नजर; रात्री 12 वाजता घरामागे बोलावलं अन्.


प्रेम आंधळं असतं असं म्हणतात...पण जेव्हा प्रेम मर्यादा ओलांडू लागतं तेव्हा त्याचे परिणामही गंभीर असतात. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीचं आपल्याच गावातील महिलेवर प्रेम जडलं होतं. यानंतर दोघे एकत्र राहू लागले होते. पण काही दिवसांनी त्याची नजर महिलेच्या तरुण मुलीवर पडली होती. त्याची वाईट नजर असल्याने महिलेसह तिची मुलगीही चिंतेत होती. याचा शेवट अखेर हत्येने झाला. महिलेने आपल्या मुलीसह मिळून त्याची हत्या करुन टाकली. 

मृत व्यक्तीचं नाव सुकरु असून तो 50 वर्षांचा होता. त्याच्या हत्येची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांना जंगलात मृतदेह सापडला होता. मृत व्यक्तीचा मुलगा सुनील कुमार याने पोलिसांना फोन करुन वडिलांची हत्या झाल्याची माहिती दिली होती. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांना मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरु केला होता. यादरम्यान पोलिसांना मृत व्यक्तीचे त्याच्यात गावातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी 48 तासातच गुन्ह्याची उकल करत दोघींना अटक केलं. 

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकरु हा दारुच्या नशेत आपली प्रेयसी गीताच्या 19 वर्षीय मुलीची छेड काढत असे. तो नेहमी मुलीवर वाईट नजर ठेवून असायचा. गीताने त्याची फार समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नसे. यानंतर अखेर गीताने त्याला संपवण्याता कट आखला. 


गीताने सुकुरुला रात्री 12 वाजता घराच्या मागच्या बाजूला बोलावलं. यानंतर आधी काठीने मारहाण करत आणि नंतर दुपट्ट्याने गळा आवळून दोघींनी त्याची हत्या केली. 

पोलिसांकडून दोघींना अटक

हत्या केल्यानंतर गीताने लेकीसह मृतदेह एका चादरीत गुंडाळून घऱापासून 100 मीटर दूर फेकला होता. पोलिसांनी दोघींची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली काठी, दुपट्टा आणि चादर जप्त केली आहे. कोर्टात हजर केल्यानंतर दोघींची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 

याप्रकरणी पोलीस अधिक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितलं आहे की, दाऊदपूर गावात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदन केला असता त्याच्या हाडांना जखमा झाल्या असल्याचं निदर्शनास आलं. याप्रकरणी आम्ही महिला आणि तिच्या मुलीला अटक केलं आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. आरोपी महिलेच्या मुलीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता.