अपघातात युवक जागीच ठार
तळोधी बा. : तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव जवळील डांबर प्लांट जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना साडेसात वाजताच्या सुमारास शनिवारी सायंकाळी घडली. मृत पावलेल्या युवकाचे नाव प्रशांत नरेंद्र मेश्राम (२४) असे असून तो सावरगाव जवळील चिखलगाव येथील रहिवासी आहे.

प्रशांत मेश्राम हा पाहुण्यांना सावरगाव बस थांब्यावर सोडून देऊन

नागपूर - चंद्रपूर महामार्गवरील दक्षिणेस चिखलगाव कडे (एम एच ३४, ई ०४४६) दुचाकीने जात होता. दरम्यान येथील डांबर प्लांट जवळील भागात जागीच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती तळोधी पोलिसांना कळविताच घटना स्थळ गाठून त्यांनी मृतास शव विच्छादना करिता नागभीडला हलविले. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सहदेव गोवर्धन करीत आहे.