जातीच्या बंधनाला हरवून अखेर बांधली रेशीमगाठ

 वडधा : ते दोघेही एकाच गावचेओळखीचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. चार वर्षांपासून सुरु असलेल्या प्रेमाचे रुपांतर लग्नात होण्यासाठी जात आडवी आली, त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन केला, पण याचवेळी तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला व त्यांचा विवाह लावून दिला. २९ ऑगस्टला भाकरोंडी (ता. गडचिरोली) येथे हा विवाह झाला

सचिन प्रभाकर हजारे (वय२७) व शालिनी शालिक गावंडे (वय २२) असे या जोडप्याचे नाव आहे. ते दोघेही चादगाव येथील रहिवासी. दोघांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यांचे चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते, पण मुलगा जातीबाहेरील


असल्याने मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता. सचिन हा मूळ भाकरोंडी येथील असल्याने त्याने शालिनीला आपल्या गावी आणले आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कडे अर्ज सादर केला. समिती अध्यक्ष देवराव सहारे यांनी दोन्ही प्रेमीयुगुलांच्या वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे पाहून लग्न लावण्याचा निर्णय घेतला.