धान पिकाला खत देताना शेतकऱ्याचा शेतात अचानक मृत्युदेसाईगंज तालुक्यातील चोप येथील घटना

कोरेगाव / चोप शेतात - धानपिकात खत देत असतांना शेतकऱ्याचा शेतात अचानक मृत्यू झाल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील चोप येथे आज २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मोरेश्वर मारोती मुंडले(४६) असे मृतकाचे नांव आहे.

चोप यथीले मोरेश्वर मुंडले हा आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक मजुर व पत्नीला

सोबत घेऊन धान पिकाला खत देण्यासाठी गेला होता. सकाळी १० च्या सुमारास पत्नी निंदन काढत होती. मजुर व मोरेश्वर हा धानाला खत देत होता. अचानक खत देतांना मोरेश्वर न दिसल्याने पत्नी व मजुराने बांधीत बघितले असता मोरेश्वर खताचा टफ घेऊन बांधीत कोसळलेला आढळला. त्याला शेजारच्या शेतकऱ्यांच्या मदतीने

रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी मोरश्वरला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण कळु शकले नाही. मोरेश्वर पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे. अचानक शेतकऱ्याचा शेतात मृत्यू झाल्या गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.